अपघातग्रस्त वारकऱ्यांवर इंदापूर क्रिटिकेअर सेंटर येथे मोफत उपचार … आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी मानले आभार

 

 

इंदापूर ( दि.६ ) : आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या वारकऱ्यांना इंदापूर येथे देशपांडे व्हेज नजीक पहाटे तीनच्या सुमारास पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वारकरी गंभीर जखमी झाले त्यांना ताबडतोब इंदापूर येथील नामांकित इंदापूर क्रीटीकेअर सेंटर या ठिकाणी दाखल केले. हॉस्पिटलचा उपलब्ध असणारा डॉक्टर मिलिंद खाडे व इतर कर्मचारी यांनी ताबडतोब जखमीवर उपचार केले. हे सर्व जखमी वारकरी जिंतूर जिल्हा परभणी येथील गोरीकर या गावचे रहिवासी व आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या मतदारसंघातील आहेत.

सविस्तर माहिती अशी आषाढी एकादशीनिमित्त इंदापूर या ठिकाणाहून पंढरपूर कडे लाखो वारकरी व पांडुरंग भक्त देवदर्शनासाठी पंढरपूरला जात असतात आज (दि.६ ) रोजी इंदापूर नजीक देशपांडे व्हेज येथे या वारकऱ्यांच्या चारचाकी वाहनाला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वारकरी गंभीर जखमी झाले. हे सर्व वारकरी आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या मतदारसंघातील असल्याने आरोग्य राज्यमंत्री यांनी ताबडतोब इंदापूरचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सिद्धार्थ नामपल्ले यांच्याशी संपर्क साधला डॉक्टर सिद्धार्थ नामपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जखमी वारकरी रुग्णांना इंदापूर क्रिटी केअर सेंटर या ठिकाणी डॉक्टर मिलिंद खाडे यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आले.

जखमी वारकरी रुग्णांची नावे

१) गंगा प्रकाश नलवडे (वय ४० वर्ष) २)

२) रामा महादेव पवार (वय ५० )

३) दत्तात्रेय नागण ठोकळवड (वय ३७)

४) भारत तुकाराम भोंडवे (वय ३७)

५) अशोक संपतराव नरवाडे (वय ३५ )

६) दिलीप संपतराव नरवाडे (वय ४० )

सर्व राहणार परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील गोरी कर या गावचे रहिवासी आहेत

सर्व जखमी वारकरी रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पुणे या ठिकाणी आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णवाहिकेद्वारे हलविण्यात आले.

योग्य व काळजीपूर्वक जखमी वारकऱ्यावर उपचार केल्याने इंदापूर क्रिटीकेअर सेंटर मधील डॉक्टर व इतर सर्व कर्मचारी यांचे आरोग्य राज्यमंत्री यांनी फोन करून आभार व्यक्त केले.

 

इंदापूर क्रिटिकेअर सेंटर हे गेल्या चार वर्षांपासून सामाजिक भान ठेवून काम करणारे रुग्णालय म्हणून नावारूपास येत आहे. नेहमीच रुग्णाची आस्तेवाईकपणे विचारपूस करून योग्य उपचार केल्याने रुग्णव नातेवाईक समाधानी असतात या ठिकाणी उपलब्ध असणारे डॉक्टर व इतर कर्मचारी यांच्या विषयी रुग्ण व नातेवाईक नेहमीच आदरभाव बाळगताना दिसून येते.

स्वराज्य न्युज शी बोलताना डॉक्टर मिलिंद खाडे व हॉस्पिटल मधील इतर कर्मचारी म्हणाले की वारकऱ्यांची रुग्ण सेवा करण्याची संधी आम्हास उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सिद्धार्थ नामपल्ले यांच्यामुळे मिळाल्याचा मनस्वी आनंद होत आहे.