माजी सैनिकांसाठी महाराष्ट्रात महसुल विभागात स्पेशल अधिकारी असावा : समाजभूषण डॉ. लक्ष्मणराव आसबे

 

 

जय हिंद आजी माजी सैनिक संघ इंदापूर तालुका ४था वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न ..

इंदापूर : येथे जय हिंद आजी माजी सैनिक संघ आयोजित ४ था वर्धापन दिन सोहळा गुरुकृपा मंगल कार्यालय येथे कामधेनु सेवा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा समाजभूषण डॉ. लक्ष्मणराव आसबे यांच्या अध्यक्षतेखाली व ले. कर्नल सतिश हंगे,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ( दि. ९ ) संपन्न झाला.

यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजभूषण डॉ लक्ष्मणराव आसबे म्हणाले की येणाऱ्या वर्धापन दिनाच्या पुर्वी महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात महसुल विभागात फक्त माजी सैनिकांसाठी अधिकारी असावा . महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात माजी सैनिकांची एक तरी केस महसुल विभागात असतेच. माजी सैनिकांच्या घर किंवा शेती च्या अनेक अडचणी असतात. कधी कधी त्यांच्या मालकी हक्काचा रस्ता अडविला जातो तर कधी मालकी हक्काच्या रस्त्यावर किंवा जमिनीवर अतिक्रमण केले जाते अशा वेळी देशाचे व आपले संरक्षण करणार्या या माजी सैनिकांना महसुल विभागात हेलपाटे मारावे लागतात हे संवेदनशिल मनाला पटत नाही फार वाईट वाटते. आरे ज्यांनी तुमच्या आणि माझ्या जीवाचे रक्षणासाठी स्वतःचे घरदार, बायका पोर, वृद्ध आई-वडील यांना सोडून सीमेवर डोळ्यात तेल घालून सेवा करतात त्यांना प्रशासन दरबारी हेलपाटे मारावे लागू नये यासाठी एक सच्चा सैनिकच सैनिकांचे प्रश्न तळमळीने सोडवू शकतो व होणाऱ्या अन्यायाला न्याय देऊ शकतो याचमुळे एक निवृत्त अधिकारी महसूल विभागात असावा अशी अपेक्षा उपस्थित असणारे अनेक सामाजिक व राजकीय पदाधिकारी व पत्रकार यांच्याकडून समाजभूषण डॉक्टर लक्ष्मणराव आसबे यांनी केली

यावेळी जिल्हाभरातून अनेक माजी सैनिकांच्या विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये वीर माता, वीर पत्नी व अनेक निवृत्त जवान उपस्थित होते.

या वर्धापन दिन सोहळ्याचे सूत्रसंचालन व उत्कृष्ट व्यवस्थापन रविराज पवार, त्रिदल माजी सैनिक सेवा संघ म. राज्य इंदापूर तालुका अध्यक्ष यांनी केले.