इंदापूर (दि.३० में ) : येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त सर्व रोग निदान शिबिर उपजिल्हा रुग्णालयात पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने सर्वरोग निदान शिबिर शनिवार (दि.३१ ) रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती सीमा कल्याणकर पुणे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी यांनी दिली.

सविस्तर माहिती अशी की शनिवार (दि.३१) में रोजी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जन्मोत्सवानिमित्त सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराची वेळ सकाळी १० वाजलेपासून असुन जास्तीत जास्त रुग्णांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अध्यक्ष सिमा कल्याणकर यांनी केले आहे.

सदर शिबिरात मोफत सिटीस्कॅन, नवजत शिशु ते ज्येष्ठां पर्यंत मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया, कर्करोग तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अल्प दरात चष्मे वाटप करण्यात येणार आहे. या शिबिरात प्रशासन, आरोग्य,कृषी व पणन इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल पाच कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. 

सदर शिबिराची आयोजक कमिटी सौ राधिका जगताप सौ रूपाली रासकर निर्मला जाधव कमल लोंढे सौ प्रियंका मोहिते स्नेहलता बंगाळे ज्योती शिंदे सोनम खरात रूपाली चव्हाण लता चव्हाण वैशाली शिंदे संध्या मंगरूळे हे आहेत. रुग्णांना काही अडचण आल्यास 9850001755 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सीमा कल्याणकर यांनी केले आहे.