
इंदापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या विविध खात्यास आखुन दिलेल्या शंभर दिवशीय कृती कार्यक्रमाचे औचित्य साधून इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीस गेलेला दहा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल मुळ मालकास पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या हस्ते काल (दि.४ ) रोजी सुपुर्द करण्यात आला.
सविस्तर माहिती अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या प्रत्येक खात्यास शंभर दिवशीय कृती कार्यक्रम आखून दिला आहे. या कृती कार्यक्रमाचे औचित्य साधून इंदापूर पोलीस स्टेशन येथे नुकताच काल मंगळवार. (दि.४ ) रोजी पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीस गेलेला मुद्देमाल पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळविण्यात यश आलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात आला.
यावेळी गणेश बिराजदार अप्पर पोलीस अधीक्षक. डॉ. सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी, सूर्यकांत कोकणे पोलीस निरीक्षक इंदापूर, स्थानिक पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
