
इंदापूर : इंदापुर विधानसभा निवडणुकीत सलग तीन वेळा निवडुन येणारे व विद्यमान राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी निवड झालेले दत्तात्रय भरणे यांचा महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या वतीने रविवारी (दि.२२ ) रोजी वाघ पॅलेस येथे जाहिर नागरी सत्काराचे आयोजन केले आसलेची माहिती इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे व शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी दिली.
दत्तात्रय भरणे हे २०१४,२०१९ व २०२४ च्या विधानसभा पंचवार्षिक निवडणूकीत सलग तीन वेळा निवडुन आले आहेत. विद्यमान मंत्रीमंडळात त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुक्यातील महायुतीच्या घटक पक्षाच्या वतीने वाघ पॅलेस येथे रविवार (दि.२२ ) रोजी भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले आहे. तरी तालुक्यातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे व शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी केले आहे.
