दिनांक २९ नोव्हेंबर

इंदापूर : आज इंदापूर येथे शासकीय विश्राम गृहात नाभिक समाजाची येत्या ९ डिसेंबर रोजी इंदापूर येथे ओबीसी नेते व विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ओबीसी च्या एल्गार महामेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातून व जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने नाभिक समाज उपस्थित राहणार आहे असे रमेश राऊत माजी जिल्हाध्यक्ष नाभिक महामंडळ यांनी सांगितले

रमेश राऊत म्हणाले की संख्येने कमी असणारा नाभिक समाज हा शब्दाला पक्का असतो त्याच्या वाट्याचे कोणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला कडाडून विरोध करेल कारण आमच्याही येणाऱ्या पिढीचा व मुलाबाळाचा प्रश्न आहेच. नाभिक समाजातील अनेकांनी राजकारण व समाजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे महाराष्ट्रात व महाराष्ट्र बाहेर ग्रामपंचायत सरपंच पासून ते पंतप्रधानापर्यंत या समाजांनी पदे भूषविले व आजही आमच्यासारखे असंख्य तरुण समाजातील प्रश्न शासन दरबारी आक्रमकपणे मांडत आहे

महाराष्ट्रात आरक्षणाचा संघर्ष उभा राहिला आहे. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला वेठीस धरले आहे . मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे परंतु आमच्या हक्काच्या ओबीसी प्रवर्गातून न देता त्यांच्यासाठी वेगळा प्रवर्ग निर्माण करावा यासाठी ओबीसी नेते व विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे व त्यांनी देखील महाराष्ट्रामध्ये जाहीर सभा घेऊन ओबीसी प्रवर्गात असणाऱ्या एकूण जाती एकाच छताखाली आणण्यासाठी ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन पुकारले आहे. व त्याचाच एक भाग म्हणून येत्या ९ डिसेंबर रोजी इंदापूर येथे ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ओबीसी एल्गार महामेळाव्यात नाभिक समाज इंदापूर तालुक्यातून व पुणे जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने आपले व्यवसाय एक दिवसासाठी बंद ठेवून सहभागी होणार असल्याचे रमेश राऊत यांनी जाहीर केले.

यावेळी तालुकाध्यक्षअवधूत पवार , शहराध्यक्ष संतोष शिरसागर, वैभव सुर्यवंशी तालुका युवक अध्यक्ष ,पंकज सूर्यवंशी तालुका युवक उपाध्यक्ष ,भागवत जाधव ,माऊली जगताप, बजरंग जगताप, सचिन देवकर, शंकर काशीद, अमित गवळी ,गणेश जगताप, बाभूळगाव चे माजी सरपंच भारत यादव, राजाभाऊ राऊत, योगेश भैया राऊत, राजेंद्र शिंदे, सोमनाथ गाडेकर इत्यादी नाभिक समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ओबीसी एल्गार महामेळाव्याचेआयोजक व क्रांतीज्योती विचार मंच चे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग (तात्या) शिंदे , माळी महासंघाचे पुणे उपजिल्हाध्यक्षअशोक भाऊ देवकर, सागरदादा रायकर, प्रकाश व्यवहारे इत्यादीआवर्जून उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *