दिनांक १६ मार्च

इंदापूर : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची सर्वच पक्षांची जय्यत तयारी झालेली आहे. प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच महाविकास आघाडी व महायुती चे घटक पक्ष यांना देखील कमालीचे महत्व प्राप्त झाल्याचे दिसत आहे. प्रादेशिक पक्षाबरोबरच विविध सामाजिक संघटना देखील निवडणुकीच्या तयारीला लागून आघाडीचा धर्म पालन करण्यासाठी आपापल्या पदाधिकारी यांच्यामार्फत प्रचाराची जय्यत तयारी करीत आहेत. महायुती चा घटक म्हणून लहुजी शक्ती सेना ही सामाजिक संघटना सध्या कार्यरत आहे. पुणे जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे बैठकांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दत्ताभाऊ जगताप यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात इंदापूर पासून तालुकास्तरीय बैठकाचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवारी इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
बैठकीत महायुतीचा धर्म पालन करण्यासाठी बारामती लोकसभेच्या उमेदवाराला लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून मताधिक्य देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील रहावे, संस्थापक अध्यक्ष लहूश्री विष्णू भाऊ कसबे यांच्या आदेशाचे पालन करून सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सामील व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांनी केले.
यावेळी तालुकाध्यक्ष अजित सोनवणे, तानाजी सोनवणे, समाधान गायकवाड, रवि खवळे,अक्षय मिसाळ , हनुमंत खुडे, बाळू घोडे, अशोक रिटे, नंदू जगताप, सचिन सोनवणे, सागर जगताप, विजय साठे, लखन वायदंडे इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
