दिनांक ३१ मार्च

इंदापूर : (दि ३१) समाज कल्याण विभागाच्या वतीने इंदापूरात तृतीयपंथी व नागरिकांनी लोकशाहीचे पवित्र कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदानात भाग घ्यावा व आपल्या पसंतीचे उमेदवार संसदेत पाठवावेत यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीगृह इंदापूर तसेच मुलांची शासकीय निवासी शाळा तरंगवाडी चे मुख्याध्यापक ग्रहपाल शिक्षक सहशिक्षक व विद्यार्थी यांच्या वतीने शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले.

ही मतदार जागृती रॅली शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहापासून तहसील कचेरी, बारामती चौक, अकलूज चौक, बाबा चौकापर्यंत येऊन सांगता झाली.

समाज कल्याण विभागाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत तृतीयपंथीय घटकाकरिता विविध योजना राबविण्यात येतात. आजच्या मतदार रॅलीचा उद्देश असा होता की तृतीयपंथीयांनी मतदानात भाग घ्यावा मतदान नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी जागृती करणे हाच उद्देश होता. आजच्या रॅलीमध्ये मतदार जागृती चे फलक, घोषवाक्य लिहिलेले फ्लेक्स, विद्यार्थी व तृतीयपंथीयांच्या हाती पाहून खरोखरच सदर रॅलीचा उद्देश सफल झाल्याचे दिसून आले.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मतदार जागृती रॅलीत गृहपाल प्रशांत रामचंद्र हेळकर, मुख्याध्यापक नसीर गुलाब मनेरी,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीग्रह इंदापूर तसेच मुलांची शासकीय निवासी शाळा तरंगवाडी, शिक्षक राहुल राजकुमार कुकडे, सहशिक्षक निलेश धनंजय निंबाळकर, शिक्षिका श्रीमती प्रीती बाळू घाटेराव, सहशिक्षिका श्रीमती विद्या बाळासाहेब काटे व तृतीयपंथी घटक प्रतिनिधी श्रीमती मोना रामराव लातूरकर, श्रीमती ओंकार महादेव अडसूळ, श्रीमती किरण नवगिरे व विद्यार्थ्यांचा सहभाग

होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *