
मोडनिंब
संघर्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद नागटिळक यांनी दि. 29 एप्रिल 2022 रोजी मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती कुर्डवाडी, मा. तहसीलदार साहेब माढा यांना परितक्या दाखल्या संदर्भात स्थानिक स्तरावर येत असलेल्या अडचणी बाबत निवेदन दिले होते. जवळपास चार महिने उलटून गेले तरी परीतक्त्या महिलांना परितक्ता दाखला मिळवण्यासाठी त्या महिलांना आज रोजी पर्यंत अडचणी येत असल्याने दि.02/10/2022 रोजी प्रांत कार्यालय कुर्डूवाडी येथे बेमुदत उपोषण करणार असले बाबतचे निवेदन दि.22/09/2022 रोजी मा. प्रांताधिकारी कुर्डूवाडी यांना देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज प्रांत कार्यालय कुर्डूवाडी येथे संस्थेच्या वतीने उपोषण करण्यात आले. यावेळी प्रांत कार्यालय कुर्डूवाडी येथील नायब तहसीलदार कदम साहेब यांनी माढा तहसील कार्यालयाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून व या उपोषणा संदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यानंतर माढा तहसील कार्यालय यांच्याकडून मा. गटविकास अधिकारी, अध्यक्ष तलाठी संघटना, ग्राम विकास अधिकारी संघटना, व संघर्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष यांच्याशी एका आठवड्यात संयुक्त मीटिंग घेऊन परितक्ता महिलांना येत असलेल्या अडचणी 100% दूर केल्या जातील. असे लेखी पत्र आल्याने नायब तहसीलदार कदम साहेब यांनी आज रोजी होत असलेले उपोषण तूर्तास स्थगित करावयाचे लेखी पत्र दिल्याने उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. यावेळी नायब तहसीलदार कदम साहेब, सोलापूर एस. पी. ऑफीस चे पोलीस रणदिवे साहेब, अकलूजचे सुरवसे साहेब, संघर्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद नागटिळक, शिवसेना गटनेते दीपक आबा सुर्वे, राष्ट्रवादी काँग्रेस माढा तालुका सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष प्रमोद गाडे, वंचित बहुजन आघाडी मोहोळ तालुका उपाध्यक्ष महादेव गाडे, वंचितचे माजी तालुकाध्यक्ष सिद्धार्थ आप्पा शेंडगे, संस्थेचे शंकर जाधव सर, संतोष ओहोळ उपस्थित होते.
