दि. १० डिसेंबर

 

इंदापूर  : प्रकाश आरडे  स्वराज्य न्युज नेटवर्क

शनिवार ( दि. १०) रोजी इंदापूर शहरातील आय कॉलेज समोर इंदापूर येथील अनाथ आश्रमातील निष्पाप मुलगी सानिका राजेंद्र लिके (वय १६ वर्ष ) उसाच्या मोकळ्या ट्रॅक्टर खाली आल्याने अपघात झाला व त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. दुपारी साधारणता एक वाजता हा आपघात झाला. शहरातील माऊली बाल आश्रमात गेल्या आठ वर्षापासून मयत मुलगी राहत होती रयत शिक्षण संस्थेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. या घटनेने इंदापूर शहरासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मयत मुलगी इलेक्ट्रिक स्कुटीवर आय कॉलेज समोरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या पुणे सोलापूर रोड वरून सोलापूर दिशेला जाणाऱ्या ट्रॅक्टरने मुलीला जबरदस्त धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

(मयत मुलगी : सोनाली)

या घटनेने शहरातील व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत असतानाच संताप देखील व्यक्त होत होता. शहरातून धोकादायक अवजड वाहनाबरोबरच उसाची वाहने देखील भरधाव वेगाने गर्दी मधून जातात. या वाहनांना पायबंद घालण्यात यावा व  त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे वारंवार पत्रकार व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी संबंधित नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन यांना विनंती केली आहे त्याचा आज पर्यंत काही एक उपयोग झाला नाही व शेवटी एका निष्पाप कोवळ्या मुलीचा जीव गेला. या घटनेने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जनतेमधून होताना दिसत आहे.

अपघातानंतर संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास आय कॉलेज समोर शोक सभेच्या आयोजन करण्यासाठी उद्धव सेनेचे शहराध्यक्ष मेजर महादेव सोमवंशी आयोजन करीत असतानाच उसाने भरलेला ट्रॅक्टर समोरुन भरधाव वेगाने आलेले पाहताच प्रचंड संतापून स्वतःची बुलेट आडवी लावून आक्रमकपणे उसाने भरलेला ट्रॅक्टर आडवीला. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी  झाली याची दखल पोलीस प्रशासनाला घ्यावी लागली.तात्काळ या ठिकाणी पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल झाले व मेजर सोमवंशी यांच्याशी चर्चा केली व वाहतूक कोंडी झालेली  पूर्ववत केली. यावेळी बोलताना मेजर महादेव सोमवंशी म्हणाले इथून पुढे शहरातून उसाने भरलेले ट्रॅक्टर आले तर शिवसेना स्टाईलने ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात येतील याची दखल संबंधित प्रशासनाने घ्यावी.

मेजर महादेव सोमवंशी यांच्या आक्रमक रूप पाहून लोकांच्य गर्दीतून त्यांना प्रोत्साहन मिळत होते व पुढील काळात उसाची वाहने दिसल्यास जागेवरच थांबविण्यात येतील व होणाऱ्या परिणामास संबंधित प्रशासन जबाबदार राहील असे लोकांमधून बोलले जात होते.

यावेळी प्रचंड लोकांनी गर्दी केली होती यावेळी उपस्थित बाळासाहेबांचे शिवसेनेचे इंदापूर शहराध्यक्ष अशोक देवकर उद्धव सेनेचे अवधूत पाटील व  साहाय्यक पोलीस निरीक्षक  ज्ञानेश्वर धनवे पोलीस नाईक सलमान खान, वाहतूक पोलीस सुहास आरणे, खाडे, पोलीस शिपाई राखुंडे,  महिला पोलीस खंडागळे  उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *