इंदापूर प्रतिनिधि : दि. ०७ जानेवारी :
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनगळी च्या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांसाठी चक्क आनंदी बाजार भरविला.सर्व ग्रामस्थांना घरोघर जाऊन बाजाराचे आमंत्रण देण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून बाजारास सुरूवात झाली.गावातील महिला पुरुष युवकांनी बाजाराला भेट दिली.विद्यार्थी विकत असलेल्या वस्तू आनंदाने विकत घेतल्या.जशजशी मुलांच्या बाजाराची विक्री होत होती.तसतसे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलत होते.कोणाचा शंभर रुपये नफा झाला,कोणाचा पन्नास ,कोणाचा तीस तर कोणाचा जेवढा माल घेतला त्यातील काही शिल्लक राहिला पण तोटा मात्र झाला नाही. ग्रामस्थ *देविदास पारेकर* आणि *रविंद्र माने* यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोफत वडापाव दिले.यावेळी पालक असलेले पत्रकार अतुल सोनकांबळे यांनी संपूर्ण बाजाराचे कव्हरेज केले.मोहन पारेकर,दिपक करगळ ,रसूल पठाण* यांनी यांच्या सह युवकवर्गाची आणि अंगणवाडी ताई *निकम मॅडम* यांच्या सह महिलावर्गाची उपस्थिती होती.
यावेळी मुख्याध्यापक *सिद्धेश्वर गणगले सर* यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचे व्यवहार कौशल्य वाढावे.पुस्तकी गणिती क्रियांचा व्यवहारात कशाप्रकारे उपयोग करून घेता येईल याचा एक आदर्श असा पाठच आम्ही विद्यार्थ्यांपुढे मांडला आहे.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गलांडवाडी नं.१ चा शिक्षकस्टाफ आनंदाने बाजारात सहभागी झाला.त्यामध्ये मुख्याध्यापक *रवींद्र सातव* ,उपशिक्षकांमध्ये *संतोष शिंदे , बाळकृष्ण तळेकर, राजेंद्र देवकर, शारदा कोथमिरे, पुनम सोनवले* यांचा सहभाग होता.आभार *सुहास मोरे* यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *