दि. २१ ऑक्टोबर

इंदापूर : सौरभ शिंदे मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर मध्ये सोनई नगर येथे येत्या मंगळवारी (दि २३) यंदाच्या नवरात्र उत्सवानिमित्त खेळ रंगला पैठणीचा व दांडिया नाईट्स चे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक सौरभ शिंदे यांनी दिली.
सौरभ शिंदे हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत असतात. त्यांच्या सामाजिक कार्यात त्यांनी कोरोना काळात इंदापुरात सर्वप्रथम मास्क वाटप व कोरोना विषयी जनजागृती सौरभ शिंदे यांनीच केली. नागरिकांशी सातत्याने संवाद व त्यातून त्यांच्या अडीअडचणी, समस्या, प्रश्नाची जाण व त्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. कामे मार्गी लावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. महिलांसाठी गणेश उत्सव, नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचे बहुमूल्य असे काम त्यांनी आजपर्यंत केलेले आहे .सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला मुलगी झाल्यानंतर त्या मुलीचे वाद्याच्या गजरात जोरदार स्वागत केल्याने संपूर्ण पुणे जिल्ह्यात हा चर्चेचा विषय झाला होता.
यावर्षी देखील त्यांनी व त्यांच्या मित्र परिवारांनी खेळ रंगला पैठणीचा व दांडिया नाईट्स कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे खास आकर्षण सिने अभिनेत्री पावनखिंड व शेर शिवराज चित्रपटात काम केलेली व सुख म्हणजे नेमके काय असते या टीव्ही मालिकेतील माधवी निमकर उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर प्राजक्ता घाग नऊवारी साडी सॉंग फेम व दीप्ती हलवाई सेलिब्रिटी अँकर उपस्थित राहणार आहेत. सहभागी महिलांसाठी फ्रिज, कुलर, ओव्हन, शेगडी, मिक्सर इत्यादी विविध आकर्षक बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे. तरी पंचक्रोशीतील तमाम महिला भगिनींनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक सौरभ शिंदे यांनी केले.
