दि. २ नोव्हेंबर

इंदापूर : मराठा आरक्षणाचा विषय अंतिम टप्प्यात आलेला असतानाच राजकीय पदाधिकाऱ्यांसह लोकनियुक्त सदस्यांचे राजीनामा सत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरात सुरू आहे आज इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली ग्रामपंचायत उपसरपंचासह नऊ सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव राजकीय किंवा हाडाची दुश्मनी विसरून आरक्षणासाठी एकत्र लढा देत आहेत, त्यासाठी राजकीय पद किंवा प्रतिष्ठा बाजूला ठेवून या आंदोलनाचे समर्थन करीत आहेत. 

इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली गावच्या नऊ सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे देऊन मराठा आरक्षणाचे समर्थन केले आहे. या सर्व सदस्यांचे सकल मराठा समाजाच्या वतीने तालुक्यात अभिनंदन होत आहे व या लढ्यात आपण सर्वजण मनापासून सहभागी झाला त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *