दिनांक २२ नोव्हेंबर

करमाळा : करमाळा येथे मातंग एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे व कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांच्या आदेशानुसार तालुका व शहर कार्यकारिणीची आढावा बैठक मंगळवारी (दि २१) सोलापूर जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व संघटनेत काम करत असताना घ्यावयाची काळजी, संघटन वाढीसाठी पदाधिकाऱ्यांनी करावयाची कामे, व सामाजिक विषयावर प्रबोधनात्मक चर्चा झाली.
यावेळी जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे म्हणाले की करमाळा तालुक्यामध्ये संस्थापक अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांच्या उपस्थितीत अनेक शाखेचे उद्घाटन करण्याकरिता तालुका व शहर कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे व संघटनेचे जाळे तालुक्यात घट्ट करावे व येणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये संघटनेची ताकद दाखविण्यासाठी व सत्तेतील वाटा मिळविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असा आदेश वजा सूचना सर्व पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी तालुकाध्यक्ष शरद भैया पवार, महिला तालुकाध्यक्ष सविताताई मोहिते, युवक तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी संतोष आरणे (प्रदेश सरचिटणीस) , पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान मोहिते, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रतन भाऊ शिंदे, शहराध्यक्ष नितीन आल्हाट, सूर्यकांत ढावरे, डी व्ही चव्हाण, मनीषा लहू जगताप (कंदर महिला शाखा अध्यक्ष), संगीता लांडगे, उपाध्यक्ष छाया सरोदे, दीपक लोंढे, मंदाबाई थोरात (तालुका उपाध्यक्ष महिला आघाडी), इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रस्ताविक तालुकाध्यक्ष शरद भैय्या पवार यांनी तर उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार दयानंद करडे यांनी
मानले.
