दि.२३ नोव्हेंबर

इंदापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी सौं. अमृता फडणवीस यांचे राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे गुरुवारी (दि.23) स्वागत केले.  

            यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक केली श्री नृसिंहाची पूजा केली व दर्शन घेतले. येथे येऊन बराच कालावधी लोटल्याने श्री नृसिंहाची दर्शनासाठी येण्याची ओढ होती. आज श्री विठ्ठलाची व श्री लक्ष्मी-नृसिंहाची पूजा केली आहे, हा मोठा योग आहे. श्री नृसिंह भगवान सर्वज्ञ आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे काहीही मागावे लागत नाही, मनात असेल ते सगळे मिळते, असे याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *