दि.२४ नोव्हेंबर

इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते बावडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवडीबद्दल रणजीत अशोकराव घोगरे यांचा इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो येथे शुक्रवारी (दि.24) सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांची यांनी रणजीत घोगरे यांचे अभिनंदन केले व हार्दिक शुभेच्छा दिल्या.

        बावडा ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली काळेश्वर ग्रामविकास पॅनलने ग्रामपंचायतीमध्ये बहुमत मिळवीत पल्लवी गिरमे या सरपंचपदी प्रचंड बहुमताने विजयी झाल्या. नूतन उपसरपंच रणजीत घोगरे यांच्या सत्कार प्रसंगी अशोकराव घोगरे, विलासराव वाघमोडे, समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे, उत्तमराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *