दिनांक २६ नोव्हेंबर

इंदापूर : लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी ता. इंदापूर जिल्हा पुणे मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य भीमराव आवारे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

तालुक्यातील बोराटवाडी येथील लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ज्युनियर विभागाचे प्रा. सदाशिव दगडे, विद्यालयाचे प्राचार्य भीमराव आवारे व सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सामुदायिक संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले.
