दिनांक २६ नोव्हेंबर

इंदापूर. : इंदापूर तालुक्यातील निमसाखर एज्युकेशन सोसायटी संचलित एन . ई.एस.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला.

  विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर खरात सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख चंद्रकांत बोंद्रे सर यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर खरात सर, विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक प्रमोद चव्हाण सर, अनुराधा रणवरे मॅडम यांनी संविधान दिना विषयी माहिती व्यक्त केली. त्यावेळी विद्यालयातील मुलींनी संविधानाचे वाचन केले. तसेच २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. प्राचार्य, चंद्रकांत रणवरे सर, पर्यवेक्षक मधुकर खरात सर, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख चंद्रकांत बेंद्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सांस्कृतिक विभागाने उत्तम प्रकारे पार पाडला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *