दिनांक ११ डिसेंबर

 

 

 इंदापूर :  श्री बाबीर देवाचे मंदिर हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रसह देशभरातील लाखो भाविकांचे श्री बाबीर देव श्रद्धास्थान आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या काम भव्य दिव्य झाले पाहिजे असे नमूद करून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बाबीर देव मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी रू.१५ लाखाची देणगी रुई येथे रविवारी(दि.१०) आयोजित भूमिपूजन प्रसंगी जाहीर केली व १ लाख रू रोख दिले. 

         या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, श्री बाबीर देवाचे आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी आहेत. सन १९९५ पासून एकही यात्रा चुकवलेली नाही. दिवाळीला देवाच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी बुधवार दि.१५ नोव्हेंबर रोजी येथे आलो होतो. सदर प्रसंगी अमोल भिसे यांच्या गजी ढोल स्पर्धेतही सहभागी झाले होतो.

            श्री बाबीर देवाचे दर्शन घेतल्यावर वेगळी ऊर्जा मिळते व त्यापासून निर्माण झालेला उत्साह सतत प्रेरणा देत असतो. श्री बाबीर देवाच्या निर्माण होणाऱ्या भव्यदिव्य मंदिरामुळे व परिसराच्या विकासामुळे इंदापूर तालुक्याच्या वैभवात भर पडणार आहे, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

      इंदापूर तालुक्याला ऐतिहासिक मंदिरांचा वारसा लाभला आहे. नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिर, श्री बाबीर देवाचे मंदिर यांचा त्यामध्ये समावेश आहे. आगामी काळातही श्री बाबीर देव मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी लागेल ते सहकार्य केले जाईल, असेही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी न

मूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *