दि.१५ डिसेंबर

इंदापूर : शहरात वारंवार होणाऱ्या किरकोळ व गंभीर अपघाताला कारणीभूत असणाऱ्या अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी करावी ,अशा आशयाचे निवेदन इंदापूर पोलीस, नगरपरिषद व तहसील प्रशासन यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात आले

 

निवेदनात नमूद केले आहे , दिनांक १४ डिसेंबर रोजी खुळे चौक या ठिकाणी एका दुचाकी ला धडक दिल्यामुळे शाळकरी मुलगी व तिचा भाऊ अपघातात गंभीर जखमी होऊन दुखापत झाली. असे अपघात भविष्यात होऊ नये यासाठी संबंधित प्रशासनाने शहरातून वाहतूक होणाऱ्या अवजड वाहनांवर व उसाच्या ट्रॅक्टर यांची वेग मर्यादा प्रमाणात असावी व उभ्या असणाऱ्या चार चाकी वाहणावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे . निवेदनात असेही नमूद केले आहे की शहरात दोन नियमित पोलिसांची नियुक्ती करावी.

निवेदनात असे नमूद केले आहे नमूद मुद्द्यानुसार कारवाई झाली नाही तर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून याविषयी आवाज उठविणार आहे.

यावेळी इंदापूर तालुका सामाजिक न्याय कार्याध्यक्ष विकास खिलारे, इंदापूर शहराध्यक्ष सामाजिक न्याय अनिल ढावरे, तालुका अध्यक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती आप्पा वाघमोडे, बारामती लोकसभा कार्याध्यक्ष अक्षय कोकाटे, महिला शहराध्यक्ष रेश्मा शेख, इंदापूर शहर सामाजिक न्याय कार्याध्यक्ष श्रीकांत मखरे, तालुका महिला सरचिटणीस रंजना राऊत, इंदापूर शहर महिला सरचिटणीस तमन्ना शेख, इंदापूर शहर महिला उपाध्यक्ष पूजा कांबळे, इंदापूर शहर सामाजिक न्याय उपाध्यक्ष अजय पारसे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *