प्रकाश आरडे ( स्वराज्य न्युज )

इंदापूर : गेल्या पंचवीस वर्षापासून देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असणारे समद सय्यद यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार ) पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नुकतेच पुणे येथे खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
समद सय्यद हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना शरद पवार यांचे विचार व लढाऊ बाणा पाहून शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून नावारूपाला आले. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) सक्रिय कार्यकर्ते म्हणून पक्षात काम करीत होते. पक्षाची ध्येय धोरणे समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे, याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतर त्यांनी संस्थापक अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबत राहण्याचा निश्चय केला. त्यांचा याच प्रामाणिकपणाचा गौरव म्हणून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
समद सय्यद यांचा इंदापूर तालुक्यातील तरुण वर्ग व सर्व जाती धर्मातील लोकांशी असणारा स्नेह व कधीही उपलब्ध असणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असल्याने त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तालुक्यातील युवकांचा व नागरिकांचा वेगळाच आहे. त्यांच्या याच संबंधाचा व स्नेहाचा फायदा निश्चित पक्षाला मिळेल असा विश्वास वरिष्ठांना निश्चितच असणार.
यावेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील,कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, किसन जावळे, विकास खिलारे, युवराज सरक यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
