दिनांक २४ एप्रिल

इंदापुर : (दि.२४) यवतमाळ येथे महात्मा फुले चौकात असणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर शाईफेक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी आशा आशयाचे निवेदन तहसीलदार इंदापूर यांना अशोक देवकर पुणे जिल्हा संघटक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांनी तहसीलदार इंदापूर (दि.२४) यांना देण्यात आले. यावेळी विविध संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सविस्तर माहिती अशी यवतमाळ येथे महात्मा फुले चौक येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर शाहीफेक करणाऱ्या माथेफिरू इसमाचा जाहीर निषेध करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आशा आशयाचे निवेदन तहसीलदार इंदापूर यांना देण्यात आले. निवेदनात असे नमूद केले आहे की दिनांक २१ एप्रिल रोजी यवतमाळ येथील महात्मा फुले चौकात महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाजकंटकांनी शाहीफेक केली आहे या घटनेचा आम्ही संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत निवेदनात पुढे असेहि नमूद केले आहे की ज्या महामानवाने सत्याचा शोध घेण्यासाठी सत्यशोधक चळवळ उभी केली आहे, ज्याने शिक्षणाचा पाया रचला, बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली केली समाजात समता व बंधुभाव वाढीस लागावा यासाठी अहोरात्र काम केले अशा महामानवाची विटंबना होणे दुखद घटना आहे. शाईफेक करणाऱ्या समाजकंटकावर स्वतंत्र पदकामार्फत चौकशी करण्यात यावी व भविष्यात अशा घटना होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे नमूद केले आहे

निवेदनावर ॲड. दशरथ यादव, लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप, मा. नगरसेवक पोपट शिंदे, व अनेक पदाधिकारी व विविध संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

निवेदनाच्या प्रती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तहसीलदार इंदापूर, यांना देण्यात आले आहे

त.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *