दि. १० ऑक्टोबर

टेंभुर्णी : काल दि. १० ऑक्टोबर रोजी टेंभुर्णी येथे रामभाऊ वाघमारे प्रदेश सरचिटणीस मातंग एकता आंदोलन म. राज्य यांच्या संपर्क कार्यालयामध्ये एका छोटेखानी कार्यक्रमात करमाळा तालुका अध्यक्ष सविता मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा तालुका महिला आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये तालुक्यातील महिला आघाडी कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी रामभाऊ वाघमारे, प्रदेश सरचिटणीस मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणार आहे.
नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे
संगीता लांडगे : करमाळा तालुका उपाध्यक्ष
मनीषा जगताप : कंदर शाखाध्यक्ष
गंधाबाई थोरात : कंदर शाखा उपाध्यक्ष
नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदेश सरचिटणीस रामभाऊ वाघमारे यांच्या हस्ते देण्यात आले .यावेळी रामभाऊ वाघमारे म्हणाले की आपले नेते व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे व कार्याध्यक्ष व पुणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक अविनाश बागवे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे काम मनापासून करावे व समाजातील ज्वलंत प्रश्नावर आक्रमक होऊन पुरुषांच्या बरोबर महिलांनी देखील काम करावे.निश्चितच संघटनेच्या नावाला गालबोट लागणार नाही याची दक्षता आपण सर्वजण घ्याल हीच अपेक्षा व भावी वाटचालीस शुभेच्छा.
यावेळी करमाळा तालुका अध्यक्ष सविता मोहिते म्हणालया की ,करमाळा तालुक्यामध्ये महिला आघाडी भविष्यात उत्तम पद्धतीने काम करेल व संघटना वाढीसाठी आम्ही सर्व महिला आक्रमक पद्धतीने काम करू. सध्या महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरती मोठे आंदोलन उभा करण्याचा आमचा मानस आहे त्यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे व कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांना करमाळा तालुक्यामध्ये आणून भव्य कार्यक्रमाचे नियोजन करणार आहे.
याच कार्यक्रमांमध्ये सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी भगवान मोहिते यांचीही निवड करण्यात आली.
