एकरकमी एफ.आर.पी, ऊस दर,वजन काटामारी यांसारख्या शेतकऱ्यांच्या वेदनेचा पाढा ऊस परिषदेत वाचला जाणार

शेतकऱ्यांचा पांडुरंग तथा स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्वेसर्वा माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ऊसउत्पादक शेतकरी यांच्या घामाचे दाम मिळवण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १ वाजता विक्रमसिंह क्रीडांगण जयसिंगपूर येथे २१ वी ऊस परिषद मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त तरण्याबांड शेतकऱ्यांच्या पोरांनी, शेतकरी चळवळीवर प्रेम करणाऱ्या मान्यवरांनी,पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष शिवराम गायकवाड यांनी केले आहे

