टेंभूर्णी : संतोष वाघमारे

टेंभुर्णी शहरालगत ३० ते ४० लहान, मोठी गावे असून जिल्हयातील सर्वांत मोठी एम आय डी सी आहे. टेभुर्णी परिसरात शुगर फॅक्टरी असल्या कारणाने या परिसरात ऊस तोड कामगारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते, यामुळे या परिसरामध्ये भेसळयुक्त दारुचा व बेकायदेशीर दारु विक्रेत्यांकडून वाहतुक मोठ्या प्रमाणात केली जात असुन यामुळे टेंभुर्णी व परिसरातील नागरीकांचे जिवन धोक्यात आले आहे.तरी सदर होत असलेली बेकायदेशीर व भेसळयुक्त दारु विक्री थांबवण्यात यावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल धुमाळ यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
टेंभुर्णी शहरालगत असलेल्या शिराळ (टें) आढेगांव, उजनी, भिमानगर, राझणी चांदन, आलेगांव (बु), रुई म्हसोबाचे आलेगांव खुर्द, गारअकोले टाकळी, पिंपळनेर, वेणेगांव, आकुंबे, बेंबळे, भोसले वस्ती, उंबरे, चव्हाणवाडी घोटी, शेवरे, मिटलवाडी, यापरिसरामध्ये बेकायदेशीर दारुचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जात असुन त्यामध्ये टेंभुर्णी शहरातील ४ ते ५ तरुणांचा समावेश आहे. सदरची दारु ही राजरोसपणे मोटारसायकल, चारचाकी वाहन, याव्दारे पुरवठा केला जात आहे. सदरची बेकायदेशीर व भेसळयुक्त दारु ही मोहोळ, माळशिरस, इंदापुर या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात आणून या दारुमध्ये केमिकल युक्त दारु मिश्रीत करुन ब्रँडेड दारु या नावाखाली टेंभुर्णीतील व ग्रामीण भागातील काही तरुण मिळून हि पोहोच केली जाते.
सदरचा बेकायदेशीर दारु विक्री आणि वाहतुक वामुळे शासनाचा कोटयावधीचा महसूल बुडत असुन यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी वरोरम भेसळयुक्त दारू विक्री व वितरीत करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अन्यथा लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमोल धुमाळ यांनी दिला आहे.
