इंदापूर : प्रवीण भैय्या माने यांच्या भाजपा प्रवेशानंतर पहिल्याच कार्यकर्ता मीटिंग वेळी वरील उद्गार काढले

सविस्तर माहिती अशी प्रवीण भैया माने यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच इंदापूर येथे तालुक्यातील काल  मंगळवार (दि.७) रोजी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मीटिंग वेळी आक्रमक होऊन येणाऱ्या सर्व निवडणुका कार्यकर्त्यांच्या एकीच्या बळावर जिंकण्याच्या हेतूनेच लढविल्या जातील असे स्पष्ट केले. यावेळी अनेकांनी प्रवीण भैया माने यांच्या नतृत्वाखाली भाजपा प्रवेश केला यावेळी जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी जुने पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच प्रवीण भैया माने यांच्या सोबत खंबीर साथ देणारे व नवीन प्रवेश केलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन मयूरसिंह पाटील व अनेक नवीन कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण भैया माने यांनी शेतकऱ्यांच्या अनेक जिव्हाळ्यांच्या प्रश्नावर सडेतोड भूमिका मांडली वेळप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून प्रश्न मार्गी लावण्याचे जाहीर केले.

अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला.

यामध्ये अनेक तरुणांचा सहभाग होता.

यावेळी प्रवीण भैया माने यांनी स्पष्ट केले की जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्याचा योग्य सन्मान करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे एक दिलाने काम करून पक्षाचे सदस्य संख्या वाढवून व पक्षाच्या आदेशानुसार येणाऱ्या सर्व निवडणुका एकीच्या बळावर लढवून जिंकून आणु. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ बाबासाहेब चौरे, मा.पंचायत समिती सदस्य मारुती अण्णा वनवे, आकाश कांबळे पुणे जिल्हा सरचिटणीस,माऊली वाघमोडे, तेजस देवकाते, राम आसबे तालुका पुर्व मंडल अध्यक्ष, प्रमोद कुमार जगताप पुणे जिल्हा सचिव, युवा नेते नितीन दादा आरडे,  महिला पदाधिकारी भाजपा महिला मोर्चाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष शितल साबळे, माधुरी भराटे, सलमा खान, रूपाली रणदिवे व अनेक निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *