दि. १२ नोव्हेंबर

भिमानगर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक पदी रांजणी(देवाची) येथील, सध्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या टाकळी तालुका माढा येथे शाखा अधिकारी म्हणून कार्यरत असणारे राजकुमार सरवदे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भिमानगर येथे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, यावेळी माजी कृषी सभापती संजय दादा पाटील व पै. गणेश पाटील उपस्थित होते.
यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, आपण निश्चितच आपल्या पदाला साजेशे काम करून सर्वांना योग्य नाही द्याल व बँकेची व सभासदाची भरभराट कराल. आपले काम नेहमीच बँकेच्या हिताचे त्याचबरोबर सभासदांना योग्य न्याय देण्याचे राहिले आहे. आपण आमदार बबनदादा शिंदे व संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक काम कराल हीच अपेक्षा व आपल्या भावी कारकीर्द माझ्या वतीने व इंदापूर तालुक्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
यावेळी बिभीषण देवकर, दिगांबर आरडे, पप्पू कांबळे व बहुसंख्य तरुण उपस्थित होते.
