दि. १५ नोव्हेंबर

इंदापूर : क्रांती पिता लहुजी वस्ताद साळवे यांची २२८ वी जयंती लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप व अनेक पदाधिकाऱ्यांनी संस्थापक विष्णुभाऊ कसबे यांच्या आदेशावरून मोठ्या उत्साहात साजरी केली.
कालठण येथे संघटनेच्या अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ, पत्रकार यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी लहुजी वस्ताद साळवे यांनी इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्याची मशाल पेटवून अनेक जहाल क्रांतिकारक कसे निर्माण केले, स्वतः अविवाहित राहून मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी ही क्रांतिकारी प्रतिज्ञा करून शेवटच्या श्वासापर्यंत मातृभूमीच्या रक्षणासाठी प्रखर लढा दिला याची आठवण करून दिली.

लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी केली. ग्रामीण भागातील महिला, लहान मुले ,जेष्ठ यांच्या आरोग्याच्या अनेक गंभीर तक्रारी असतात. शासकीय ग्रामीण रुग्णालयात वेळेवर औषध पुरवठा उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना इंदापूर सारख्या शहरांमध्ये येऊन महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची वेळ येते, हि समस्या लक्षात घेऊन पुणे जिल्ह अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांनी डॉ. इशा बंगेरा यांच्या स्वाधीन मोठ्या प्रमाणात औषध पुरवठा केला व भविष्यात ग्रामीण रुग्णालया मध्ये औषध पुरवठा वेळेवर करण्यात यावा अशी ही विनंती केली.
उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथेही मोठ्या प्रमाणात रुग्णांना फळे वाटप डॉक्टर सुहास शेळके यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.

यावेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना संचालक हनुमंत जाधव, सामाजिक कार्यकर्ते सिताराम नाना काटे, डॉ इशा बंगेरा,अण्णासाहेब कोळेकर, दादासाहेब जगताप, संतोष जगताप, किंचक जगताप, नंदू जगताप, सागर जगताप, प्रताप शेंडगे, ब्रह्मदेव सपकाळ, मधुकर चव्हाण भारत शिंदे, नरहरी चव्हाण , बाळासाहेब जगताप,तुकाराम पांडुळे विशाल जगताप, विनोद चव्हाणअविनाश जगताप, राहुल जगताप,यांच्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत आजी माजी सदस्य यांच्यासह गावातील समाज बांधव व ग्रामस्थ व अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर , पत्रकार शिवाजी (आप्पा) पवार सुधाकर बोराटे सुरेश मिसाळ समीर सय्यद अतुल सोनकांबळे प्रकाश आरडे उपस्थित होते.
