११ डिसेंबर

इंदापूर : इंदापूर शहरातील कायम चर्चेत असणारा विषय म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केलेल्या दुचाकी व चार चाकी वाहनांची प्रचंड गर्दी व या गर्दीतुन जीव मुठीत घेऊन वाट काढणारे सर्वसामान्य नागरिक, विध्यार्थी आणि रस्त्याने भरधाव वेगाने ऊस वाहतुक करणरी वाहने यामुळे इंदापूर शहरातील नागरिक, शालेय विदयार्थीयांचे जीवितास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असुन या समस्येबाबत संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केलेने शनिवारी दुपारी साडेबारा वा. चे दरम्यान इंदापूर शहरातील जुना पुणे सोलापूर हायवे रोड, आय कॉलेज समोरील रस्त्यवर एका निष्पाप व कोवळ्या जीवाला आपल्या प्राणास मुकावे लागलेने झोपी गेलेले पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. व रविवार दिनांक ११ डिसेंबर रोजी शहरातील जुना पुणे-सोलापूर हायवे रोडवरील बेशिस्त पार्किंग वर कडक कारवाईचा बडगा उगारत पोलीस कारवाई करण्यात आली.
यासाठी नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग,तहसिल व पोलीस प्रशासन यांना वारंवार लेखी निवेदन सामाजिक कार्यकर्ते, व दक्ष नागरीक यांनी दिले होते परंतु यांची घोर निराशा होत असे.
काल आशाच भरधाव वेगाने शहरातुन आय कॉलेज समोरून जाणारया उसाच्या मोकळ्य ट्रॅक्टर ने धडक दिल्याने अनाथ आश्रमातील मुलीला जीव गमवावा लागला. याचे पडसाद शहरात उमटले संबंधीत प्रशासनावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा अशीही मागणी जोर धरू लागली.
आज आठवडे बाजार दिवशीच पोलीस निरीक्षक टि. वाय. मुजावर यांनी अशा बेशिस्त वाहनांवर धडक कारवाई केली. या बेशिस्त वाहन धारकांचे वाहन चालविण्याचा परवाना देखील तपासण्यात आला. या धडक कारवाई मुळे वाहन धारकांची पळापळ झाली. धडक कारवाई मुळे बेशिस्त वाहनधारकां मध्ये चांगलीच दहशत बसली.
या बेशिस्त वाहनांमुळे अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. आजच्या कारवाई मुळे व्यवसाय धारक समाधानी झाले आहेत. अनेक लघु व्यवसायीक यामुळे जाम खुष झाले. पोलीस निरीक्षक टि. वाय. मुजावर यांचे कौतुक यामुळे होत आहे. यापुढे अशी बेशिस्त वाहने पार्किंग होणार नाहीत याचेही समाधान अनेक व्यवसायीक बोलुन दाखवित आहेत.
कारवाई करण्यात आलेली वाहने टेंपोत भरून पोलीस ठाण्यात आणण्यात आली.
