इंदापूर परिसरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे लोकसेवक गणपतराव आवटे फाउंडेशनच्या माध्यमातून वाटप करण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्याच्या उद्देशाने उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना लागणारे शालेय साहित्य वर्षभर पुरेल असे साहित्य वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये कोणतीही अडचणी येऊ नये म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. छवा ग्रुप चे अध्यक्ष किशोर घोलप यांच्या वाढदिवसानिमित्त व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर येणाऱ्या हसू हेच आमच्या कामाचे पावती असल्याचे मत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर आवटे यांनी व्यक्त केले. यावेळी विकास शिंदे, विशाल करडे , हर्षल राऊत,ॲड.आनंद केकाण, सोमनाथ लांडगे,मयुर कळसाईत यांच्या उपस्थितीत पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *