- प्रकाश आरडे : स्वराज्य न्यूज

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असता इंदापूर येथे दिनांक २३ सप्टेंबर रोजी आंबेडकर नगर येथील नियोजित कार्यक्रमास आल्या असता लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक विष्णूभाऊ कसबे यांच्या आदेशान्वये पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांनी जगद्विख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केंद्रीय मंत्री यांच्याकडे केली
जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे ज्यांच्या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम जगदविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर करुन समाज परिवर्तन केले अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास साता समुद्रा पलीकडे जाऊन मांडला होता या सर्व महान कार्याची दखल घेऊन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा सन्मान
करून भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे या आशयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हाध्यक्ष मा. दत्ता भाऊ जगताप, युवा नेते मा.ललेंद्र भाऊ शिंदे, युवा नेते अभिजीत अवघडे,अरविंद ढावरे, दादा गवळी,दत्ता भाऊ काळेल यांच्या सह लहू सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
