प्रकाश आरडे : स्वराज्य न्यूज

इंदापूरचे प्रसिद्ध कापड व्यवसायिक गोकुळदास शहा (वय८६) यांचे दिनांक १० सप्टेंबर रोजी निधन झाले शहा कुटुंबियावरती दुःखाचा डोंगर कोसळला गोकुळदास शहा यांचा इंदापूर तालुक्यात अनेक संस्था उभारणीत लाख मोलाचा वाटा होता, त्यापैकीच एक संस्था म्हणजे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ. या संस्थेचे सध्या विद्यमान अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत.
विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे शहा कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी इंदापूर येथे शहा यांच्या निवासस्थानी दिनांक २४ सप्टेंबर रोजी आले असता, गोकुळदास विठ्ठलदास शहा व त्यांचे पूर्वज यांचे इंदापूर शहराच्या जडणघडणीत असलेले योगदान तसेच अनेक संस्था उभारणीत असलेले योगदान लक्षात घेता गोकुळदास शहा यांचे चिरंजीव मुकुंदशेठ शहा यांना तुम्ही आता इंदापूरच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्हा असा मौलिक सल्ला दिला. यावेळी माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, डी एन जगताप, प्रताप पाटील उपस्थित होते.
गोकुळदास विठ्ठलदास शहा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व मुकुंदशेठ शहा यांच्याशी अनेक सामाजिक, राजकीय, व्यावसायिक विषयावर चर्चा करीत असताना गप्पांच्या ओघात वरील उद्गार काढले. विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी दिलेला सल्ला भविष्यात खरा ठरतोय का हे येणारा काळच ठरवेल.
यावेळी मुकुंदशेठ शहा, भरतशेठ शहा, अंकिता शहा, अंगद शहा,डाॅक्टर संजय शहा व शहा परिवारातील सदस्य व अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
