दिनांक २७ मार्च

इंदापूर : गुरुवारी (दि२८) रोजी शिवजयंती निमित्त सुनेत्रा पवार यांच्या हस्ते किल्ले रायरेश्वर मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी होणार असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
प्रसिद्ध पत्रकात असे नमूद केले आहे की गुरुवारी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली त्याच रायरेश्वर किल्ल्यावरील मंदिरात सुनेत्रा पवार यांच्यातर्फे बारामती लोकसभा मतदारसंघातील शिवकालीन गडकिल्ले व ऐतिहासिक स्थळावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
इंदापूर मधील छत्रपती शिवरायांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या गढिवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करून मोहिमेस सुरुवात होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी राजे जन्मस्थळ किल्ले पुरंदर व पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सरदार मुरारबाजी देशपांडे यांचे समाधी स्थळ या ठिकाणी यावरील मंदिरात अभिषेक करून नागरिकांच्या उपस्थितीत तोरणा किल्ला व सिंहगड येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळावर पुष्पृष्टी करण्यात येणार आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आंबेगाव येथील गौरवशाली शिवसृष्टी येथे या मोहिमेचा समारोप होईल त्यानंतर वारजे परिसरात बांधण्यात आलेल्या शिवाजी महाराज मंदिर येथे दोन हजार महिलांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे.असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
