दिनांक १३ एप्रिल

इंदापूर : दि १३) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्य साधून इंदापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीगृहात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले.

सामाजिक न्याय विभागातर्फे समता सप्ताह कार्यक्रमाचे सदर ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. सामाजिक न्याय विभागातर्फे यापूर्वी देखील मतदान जनजागृती, व विविध उपक्रमाचे आयोजन नेहमीच करण्यात येते.

आज (दि१३) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून इंदापूर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीगृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात वस्तीग्रहातील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन रक्तदान केले. रक्तदानाबरोबरच वस्तीगृहात कॅरम,बुद्धिबळ स्पर्धा,निबंध स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा असेही कार्यक्रम घेण्यात आले

.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *