इंदापूर (दि.२० ) : राज्यात होत असलेल्या विधानसभा २०२४ ची प्रचाराची रणधुमाळी संपून आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाल्यापासून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पैसे वाटप, बोगस मतदान इत्यादी घटनांनी धुमाकूळ घातला असतानाच इंदापूर तालुक्यात लाखेवाडी गावात बोगस मतदार हर्षवर्धन पाटील समर्थकांनी पकडल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत तर तालुक्यातील शिरसटवाडी गावात उमेदवार विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आक्रमक होऊन विरोधी कार्यकर्त्यांवर संतापले असल्याचा व्हिडिओ विविध प्रसारमाध्यमांनी समोर आणला आहे त्यामुळे तालुक्यात पाटील विरुद्ध भरणे संघर्ष शिगेला पोहोचला असून कोण मारणार बाजी याचीच उत्सुकता तालुक्याला लागून राहिले आहे.

लाखेवाडी गावात मतदान शांततेत सुरू असतानाच एक बोगस मतदार असल्याचे हर्षवर्धन पाटील समर्थकांनी त्यास मतदानापासून रोखले असता भरणे समर्थक श्रीमंत ढोले हे त्या मतदाराला काहीही विचारू नका असे म्हटल्याने एकच गोंधळ उडाला व त्या मतदाराला अक्षरश बुधवरून हाकलून लावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे .तर याच गावात तंटामुक्ती अध्यक्षांना हर्षवर्धन पाटील समर्थकांनी मारहाण केल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंद केली आहे. तंटामुक्ती अध्यक्षाना नाकाला जखम झाल्याचा फोटो सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे.

दुसऱ्या एका घटनेत तालुक्यातील शिरसटवडी गावात स्वतः उमेदवार दत्तात्रय भरणे स्थानिक हर्षवर्धन पाटील समर्थकांना अर्वाचे भाषेत बोलत असल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या दोन्ही घटनां मुळे पाटील विरुद्ध भरणे संघर्ष अतिशय शिगेला पोहोचला असून दोघांचेही समर्थक आक्रमकपणे आपल्या उमेदवाराला भरघोस मतदान होऊन उमेदवार निवडून यावा यासाठी चुरशीचे मतदान करून घेत आहेत. यामुळे तालुक्यात कधीकाळी मित्र असलेले समर्थक एकमेकांसमोर विरोधक म्हणून उभे ठाकले आहेत. गावागावात यामुळे प्रचंड दुफळी निर्माण झाली आहे. पुरोगामी विचाराचा संस्कारित तालुका म्हणून राज्यभर ओळख असलेला तालुका आज टोकाच्या संघर्षाने उभ्या महाराष्ट्रात ओळखला जात

आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *