इंदापूर (रेडणी) दि.०४ : रेडणी गावातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,रेडणी या ठिकाणी डॉ.शरदचंद्र पवार कृषि महाविद्यालय,बारामती येथील कृषिदुतांनी कृषि शिक्षण दिनानिमित्त कृषि शिक्षणाचे विद्यार्थ्यांना महत्त्व सांगितले.
विद्यालयात कृषिदुतांनी डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येणारा कृषि शिक्षण दिवस साजरा केला .या कार्यक्रमात कृषिदुतांनी कृषि शिक्षणातून विविध क्षेत्रात म्हणजेच उद्योग,शेती, संशोधन,स्पर्धा परीक्षा यामधील उपलब्ध संधींबद्दल इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच बी.एस्सी ऍग्री मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व प्रवेश कसा घ्यावा याबद्दलही या कृषिदुतांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक धुमाळ सर,प्रा.आटोळे सर,इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषिदुत गणेश कुंजीर,प्रशांत राऊत,सत्यजित पाचपुते,आदित्य मोहिते,प्रज्वल पवार,अभिषेक बिटले,मितलेश तरडे, विश्वराज पाटील यांनी केले. हा कार्यक्रम घेण्यास कृषि महाविद्यालय बारामतीचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.पी.गायकवाड व प्रा.एस.व्ही.बुरुंगळे यांचे सहकार्य लाभले.
