filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (0.68333334, 0.19725914);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 50;
इंदापूर : डॉक्टर तानाजी भाऊ जाधव संस्थापक अध्यक्ष टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने इंदापूर शहरात मोहन आबा नगरे व भावी नगरसेवक विवेक भाऊ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे रुग्णांना फळे वाटप व अनाथ आश्रमात लहान मुलांना फळे व खाऊ वाटप करण्यात आले . यावेळी पैलवान अशोक भाऊ चोरमल , दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोळे , युवा नेते अमजदभाई शेख, राहुल शेठ भोई सरपंच कुंभारगाव, दत्ता नगरे, विजय केवटे, युवा नेते बिभीषण चोरमले, दत्ताभाऊ जगताप पुणे जिल्हा अध्यक्ष लहुजी शक्ती सेना, गणेश खबाले रमेश भाऊ ढावरे, व असंख्य कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      महाराष्ट्रात टायगर ग्रुप च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. संस्थापक अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या माध्यमातून लाखो कार्यकर्त्यांची फळी महाराष्ट्रभर आहे. सामान्य नागरिकांना कसल्याही प्रकारची अडचण आल्यास टायगर ग्रुप चे पदाधिकारी अडचणी सोडवण्यासाठी  मनापासून धावून जातात , यामध्ये शेतकरी, महिला, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, नोकरी विषयक समस्या अशा विविध स्वरूपाच्या अडचणी टायगर ग्रुप च्या माध्यमातून सोडविल्या जातात. 
आज संस्थापक अध्यक्ष डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस गाव खेड्यापासून तालुका जिल्हा व राज्य पातळीवर टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय जोमाने साजरा केला. इंदापूर येथे विविध उपक्रमांनी  डॉ.तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *