इंदापूर : गांधीवादी विचारसरणीचे ज्येष्ठ समाजसेवक माजी खासदार शंकरराव पाटील यांचे खंदे समर्थक कै. पांडुरंग दादा देवकर यांचे प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध (दि.१४) प्रचंड जनसमुदाय व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रविण भैय्या माने व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भैया भरणे व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी आवाजाचा जादूगार ह भ प देविदास निंबळीकर यांच्या किर्तनाने दादांच्या आठवणीने उपस्थिताचे डोळे पाणावले.
कै. पांडुरंग देवकर हे संपूर्ण तालुक्यात दादा या नावाने परिचित होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे साधे राहणीमान व उच्चार विचारसरणी यामुळे जनमानसात त्यांच्याविषयी जिव्हाळा व आपुलकी होती. ते संपूर्ण तालुक्यात माजी खासदार शंकरराव पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित होते. माजी खासदार शंकरराव पाटील यांच्या निधनानंतर त्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोलाची साथ दिली. त्यांनी कधीही पदाची अपेक्षा केली नाही. माजी आमदार कै. राजेंद्र कुमार घोलप यांच्याशीही त्याचा जिव्हाळा होता.
त्यांचे गाव हिंगणगावातील संपुर्ण क्षेत्र ओलिताखाली यावे यासाठी तालुक्यातील सर्वात मोठी शिवकृपा सहकारी पाणीपुरवठा संस्था स्थापन केली व चेअरमन पद यशस्वी पणे भुषविले होते .
