
रिपब्लिकन नेते संजय भैय्या सोनवणे यांनी स्थानिकांना व सरडेवाडी टोल पासुन वीस किलोमीटर अंतरावरील सर्व गावातील स्थानिक वाहनांना सवलतीच्या दरात पास मिळावा व नोकरीसाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे या प्रमुख मागण्यासह इतर मागण्यांचे निवेदन टोल प्रशासन, तहसीलदार इंदापूर, पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच वरिष्ठ कार्यालयास देखील या आंदोलनाची माहिती देण्यात आली होती. निवेदनातील मागण्यांचा विचार न केल्यास २७ ऑक्टोबर रोजी आंदोलन होणारच असा इशारा देण्यात आला होता.
निवेदनातील नमूद वेळ संपून आज प्रत्यक्षात आंदोलनाची तारीख उजाडली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष या आंदोलनाकडे लागून राहिले आहे. सरडेवाडी टोल नाक्यापासून वीस किलोमीटर अंतराचा विचार केल्यास सोलापूर जिल्ह्यातील काही गावे येतातच त्यामुळे या आंदोलनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
स्वराज्य न्युज शी बोलताना रिपब्लिकन नेते संजय भैय्या सोनवणे म्हणाले की आपण केलेल्या सर्वच प्रमुख मागण्या मान्य करण्याची तयारी काल रात्री झालेल्या पोलीस प्रशासन व टोल प्रशासन यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मान्य केल्याने व तसे सर्व आंदोलकाच्या समोर जाहीर करण्याची तयारी दाखविल्याने आमच्या मागण्याचा आपण जर विचार करणार असाल तर आम्ही आमचे आंदोलन स्थगित करीत आहोत असा शब्द मी दिल्याने सर्व आंदोलकांनी सरडेवाडी टोल नाक्यावर यावे व आपण केलेल्या मागण्याचा विचार टोल प्रशासनातील प्रमुखांच्या मुखातून ऐकावा असे आवाहन संजय भैय्या सोनवणे यांनी केले आहे.
संजय भैया सोनवणे यांची सर्व आंदोलकांना असेही आवाहन केले आहे की आपण सर्वांनी शांततेने यावे आपल्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी व टोल प्रशासन व पोलीस प्रशासन यांना सर्व आंदोलकांनी सहकार्य करावे.
