दि. २६ ऑक्टोबर

काँग्रेस पक्षाचे विद्यमान तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी आज (दि.२६) भाजपा पक्षामध्ये प्रवेश केल्याने रिक्त झालेल्या तालुका अध्यक्ष पदावर  तालुका सरचिटणीस निवास शेळके यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे, तशी चर्चा संपूर्ण तालुकाभर व सर्वच राजकीय पक्षात व  सोशल मीडियावर आज दिवसभर चालू आहे.

सरचिटणीस निवास शेळके हे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रामाणिकपणे काम करतात. पक्षाची विविध आंदोलने व वरिष्ठांशी असलेले सलोख्याचे संबंध व त्यांनी आजपर्यंत केलेले सामाजिक कार्य या जोरावर निवास शेळके या पदाचे प्रबळ दावेदार मानले जातात.

तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखाशी व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध असताना देखील पक्षाची ठाम भूमिका सडेतोड पणे मांडणी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत, वेळप्रसंगी कोणत्याही मुद्द्यावर कुठेही चर्चा करण्याची त्यांची तयारी असते त्यांच्या याच सडेतोड भूमिकेमुळे ते जास्त चर्चेत असतात.

सामाजिक काम करत असताना  अनेक जाती धर्मातील लोकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ या संघटनेत देखील त्यांनी काही काळ पदाधिकारी म्हणून काम केले असून त्यांची संघटनेतील वरिष्ठांशी वैचारिक नाळ पक्की आहे. संघटनेतील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, व निवास शेळके हेच या पदाचे प्रबळ दावेदार आहेत असे ठामपणे आज दिवसभर सोशल मीडियात चर्चा चालू आहे.

सद्यस्थितीत काँग्रेस पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्याला किंमत असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या निवडीवरून दिसून येत आहे. तोच नियम निवास शेळके यांच्या बाबतीत खरा ठरतोय का हे पाहण्यची  उत्सुकता निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये शिगेला पोहचली आहे हे मात्र निश्चित..

निवास शेळके यांचा स्वभाव शांत असला तरी वेळप्रसंगी ते आक्रमक देखील होतात हे मागील  इंदापूर काँग्रेस भवन च्या वादाप्रसंगी दिसून आले होते. त्याच वेळी पक्षाशी निष्ठा काय असते  हे अनेकांनी जवळून पाहिले आहे. येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष कोणाला तालुका अध्यक्ष पदाची संधी देतोय हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *