प्रकाश आरडे : स्वराज्य न्युज इंदापूर

जंक्शन तालुका इंदापूर येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर होत असलेल्या नियोजित उड्डाणपुलाला “भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे संतोष कांबळे यांनी तहसीलदार इंदापूर यांच्याकडे केली आहे.
यावेळी पांडुरंग शिंदे इंदापूर तालुकाध्यक्ष ओबीसी मोर्चा, ,अमोल मिसाळ इंदापूर शहराध्यक्ष आर पी आय, सुनील सोनवणे पुणे जिल्हा आरपीआय नेते,,दत्ताभाऊ जगताप पुणे जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना प्रकाश बापू आरडे इत्यादी उपस्थित होते.
निवेदनात असे नमूद केले आहे की जंक्शन तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी होत असलेल्या उड्डाणपुलाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल असे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे .वास्तविक पाहता ६ डिसेंबर १९९३ रोजीच जंक्शन येथील चौकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असे नाव देण्यात आले होते त्याच अनुषंगाने या पालखी महामार्गावरील नियोजित उड्डाणपुलाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल असे नाव देण्यात यावे अशी मागणी तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने करण्यात येत आहे, तरी आपण आमची मागणी शासन दरबारी पोहचवावी हि विनंती असे नमूद केले.
संतोष कांबळे यांच्यासह नंदकुमार सोनवणे मा.सभापती पंचायत समिती इंदापूर, शिवाजीराव मखरे ,आरपीआय सचिव पुणे जिल्हा, संदिपान कडवळे, इंदापूर तालुका अध्यक्ष आरपीआय, पांडुरंग (तात्या)शिंदे ,इंदापूर तालुका अध्यक्ष ओबीसी मोर्चा, अमोल मिसाळ, इंदापूर शहराध्यक्ष आर पी आय, सुनिल सोनवणे, पुणे जिल्हा आरपीआय नेते, दत्ताभाऊ जगताप, पुणे जिल्हा अध्यक्ष लहुजी शक्ती सेना, प्रकाश बापू आरडे इत्यादींच्या सह्या आहेत.
निवेदनाच्या प्रती नितीन गडकरी केंद्रीय दळणवळण मंत्री,एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, रवींद्र चव्हाण सा बा मंत्री, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र, हर्षवर्धन पाटील माजी मंत्री,भाजप नेते, सुधाकर भालेराव अध्यक्ष भाजपा अनु मोर्चा म राज्य, मोहन वानखडे (सर) संघटन सरचिटणीस भाजपा अनु.जाती मोर्चा, इत्यादींना पाठविले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *