• दि. २७ डिसेंबर

करमाळा (कंदर) : कंदर मधील  दलित वस्तीच्या  वारंवार खंडित होणाऱ्या वीज प्रश्नावर पाठपुरावा करून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या उपकार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय जेऊर व सहाय्यक अभियंता महावितरण शाखा कार्यालय कंदर व संबंधित अरेरावीची भाषा वापरणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होऊन खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा व दलित वस्तीसाठी १०० kv मंजूर रोहित्र ताबडतोब बसविण्यात यावे या मागणीसाठी काल ( दि. २६)सौ सविताताई मोहिते करमाळा तालुका अध्यक्ष महिला आघाडी व कंदर मधील दलित वस्ती मधील असंख्य महिला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, कार्यकारी अभियंता विभागीय कार्यालय बार्शी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसल्याने संबंधित कार्यालयाने आपल्या मागणीप्रमाणे येत्या  १० जानेवारी पर्यंत दलित वस्ती मधील मंजूर १०० kv  रोहित्र बसवून दिले जाईल असे लेखी आश्वासन दिल्याने अखेर उपोषण मागे घेण्यात आले.

मातंग एकता आंदोलन संघटनेच्या महिला आघाडीच्या करमाळा तालुका अध्यक्ष सौ  सविताताई मोहिते व चंद्रकला खंडाळे सोलापूर जिल्ह्य अध्यक्ष, संगीताताई लांडगे तालुका उपाध्यक्ष, शाखा अध्यक्ष मंदाताई थोरात, शाखा उपाध्यक्ष छबुबाई लांडगे  ग्रामपंचायत सदस्य, मंगल गाडे, सुमन लांडगे, विद्य गरड, लैला मुलाणी,  या आक्रमक झालेल्या रणरागिणी पुढे अखेर  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी , कार्यकारी अभियंता विभागीय कार्यालय बार्शी या कार्यालयाला नमते घ्यावे लागले व येत्या १० जानेवारी पर्यंत निवेदनात नमूद मागणीप्रमाणे  १०० kv रोहित्र बसवून वीजपुरवठा उच्च दाबाने व सुरळीत केला जाईल असे लेखी आश्वासन दिल्याने संबंधित उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.

यावेळी सविता मोहिते म्हणाले की आमच्या मागणीप्रमाणे कार्यकारी अभियंता विभागीय कार्यालय बार्शी यांनी लेखी दिल्याने आमचे उपोषण मागे घेण्यात आले आहे. आमची सकारात्मक चर्चा होऊन आमची मागणी प्रमाणे वीज प्रश्नावर योग्य निर्णय दिल्याबद्दल या कार्यालयाचे मनापासून आभार व आजच्या उपोषणाला उपस्थित असणारे सर्व संघटनेचे पदाधिकारी व उपस्थित असणारे संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ वाघमारे सरपंच भास्कर भांगे तय्यब शेख भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन करमाळा तालुका अध्यक्ष,अमर कुमार माने नगरसेवक कुर्डूवाडी,भगवान मोहिते, ज्ञानदेव लोकरे,अंकुश लोकरे व या उपोषणाला संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बागाव यांनी फोनवरून योग्य मार्गदर्शन केले या सर्वांचे मनापासून आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *