दि. २५ डिसेंबर

पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी शहरातील पुणे सोलापूर रोडवरील वाढलेल्या अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी व नियमित या रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या वाहनामुळे होणाऱ्या अपघातावर नियंत्रण आणण्याकरिता जागेवरच दंडात्मक कारवाईचा सपाटा आठवडाभरापासून राबविला.यामुळे मस्तवाल पणे पार्किंग करत असलेल्या बेशिस्त वाहन धारक चांगलेच धास्तावले आहेत. या दंडात्मक कारवाईच्या भीतीने शिस्तबद्धपणे आपापली वाहने पार्किंग केल्याने रस्ता मोकळा होऊन होणारे संभाव्य अपघात नक्कीच टळणार असल्याने नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होताना दिसत आहे.
पुणे सोलापूर रस्त्याच्या कडेलाच आय कॉलेज, श्री नारायणदास रामदास हायस्कूल, बस स्टॅन्ड,पंचायत समिती व कोर्ट आहे.वाहनांचा गोंगाट ,कर्णकर्कश आवाज, रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे उभ्या करण्यात आलेल्या दुचाकी व चार चाकी वाहनामुळे बिचारा रस्ता आपल्या अस्तित्वासाठी केविलवाणे पणे प्रशासनाकडे बघत होता व व होणारे अपघात माझ्यामुळे नाहीतर या बेशिस्त वाहनधारकांमुळे होत आहेत हे सांगत होता. नेमकी हीच तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या लक्षात आलेने व आशा बेशिस्त पार्किंग केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर जागेवरच दंडात्मक कारवाई करण्याचा सपाटा लावल्याने वाहनधारक धास्तावलेमुळे रस्ता मोकळा होऊन विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक व्यावसायिक सर्वजण आनंद व्यक्त करीत आहेत.
