प्रकाश आरडे : स्वराज्य न्यूज इंदापूर

आज मंगळवार (दि.१३ सप्टेंबर) रोजी निरगुडे तालुका इंदापूर येथील ज्येष्ठ महिला सुनंदा सिताराम खाडे यांचे तहसील कार्यालय इंदापूर समोर चालू असलेले आमरण उपोषण गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या ठोस आश्वासन व यशस्वी मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप, एडवोकेट सुरज खटके, सागर परदेशी, विकी जगताप ,पत्रकार प्रकाश आरडे,पत्रकार सुंदर कुसाळकर,पत्रकार अतुल सोनकांबळे उपस्थित होते.
सविस्तर माहिती अशी निरगुडे तालुका इंदापूर येथील ज्येष्ठ महिला सुनंदा सिताराम खाडे (वय ६० वर्ष) यांच्या ग्रामपंचायत दप्तरी नावावर असलेल्या राहत्या जागेमधून अतिक्रमण केलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा अंतर्गत रस्ता गेल्याने व उंच रस्ता केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित गावच्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्या चुकीच्या रस्ता सर्वे मुळे माझी जागा तर गेली शिवाय रस्त्यामुळे सध्या पावसाळा असल्याने घरात साधारण चार फूट पाणी गेल्याने मला त्या ठिकाणी राहता येणार नाही,शिवाय हा रस्ता होऊ नये म्हणून मी ग्रामपंचायत स्तरापासून पंचायत समिती व तहसीलदार यांना वारंवार विनंती करूनही माझ्यावर रस्ता करून अन्याय केला आहे. माझे म्हणणे संबंधित प्रशासनाने ऐकले नाही उलट माझ्यावर खोटी ॲट्रॉसिटी दाखल करून मला नाहक मानसिक त्रास दिला आहे. या सर्व घटनेला जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई व्हावी व मला भिगवन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी गुन्हा तुन मुक्त करावे व रस्त्यामुळे गेलेली जागा पुन्हा माझ्या ताब्यात मिळावी असे म्हणणे या महिलेचे आहे.
वरील मागणीसाठी उपोषणास बसत असल्याचे लेखी पत्र भिगवन व इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर दिल्यानंतर संबंधित पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कलम १४९ प्रमाणे संबंधित जेष्ठ महिलेस उपोषणास बसू नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपल्यावर किंवा कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे लेखी पत्र दिलेले असताना सुद्धा या ज्येष्ठ महिलेने आज दि. १३ सप्टेंबर पासून तहसील कार्यालय इंदापूर समोर आमरण उपोषणास बसली होती ही सर्व हाकिकत उपस्थितांच्या लक्षात आल्याने सर्वांनी मिळून पोलीस प्रशासन,गटविकास अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली असता ताबडतोब गटविकास अधिकारी,पोलीस कर्मचारी समाधान केसकर, महिला पोलीस कर्मचारी उपोषण स्थळी आले व संबंधित जेष्ठ महिलेचे म्हणणे ऐकून घेऊन उद्याच त्वरित स्वतः गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी, पोलीस प्रशासन, पोलीस पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांच्यासह प्रत्यक्ष निरगुडे तालुका इंदापूर येथील उपोषणकर्त्या महिलेच्या म्हणण्यानुसार अतिक्रमण करून केलेला सिमेंटचा रस्ता, या घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून योग्य तो न्याय दिला जाईल असे ठोस आश्वासन गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी दिले व उपोषण थांबवावे अशी विनंती केली. यावेळी विनंतीला मान देऊन ज्येष्ठ महिलेने उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केली व समाधानकारक न्याय न मिळाल्यास पुन्हा आमरण उपोषण याच ठिकाणी करणार असल्याचे जाहीर केले.
गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या हस्ते पाणी व चहा घेऊन उपोषण स्थगित केल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला व उपस्थित दत्ताभाऊ जगताप पुणे जिल्हा अध्यक्ष लहुजी शक्ती सेना, एडवोकेट सुरज खटके,सागर परदेशी, विकी जगताप व पत्रकार या सर्वांनी गटविकास अधिकारी यांनी उपोषणकर्त्या ज्येष्ठ महिलेस प्रत्यक्ष वस्तूस्थिती बघून योग्य न्याय दिला जाईल असे जाहीर केल्याने समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *