दि. २४ जून

इंदापूर : बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज देहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे महाराज देहूकर व विश्वस्तांचा आणि पालखी सोहळा प्रमुख संतोष मोरे महाराज, संजय मोरे महाराज व अजित मोरे महाराज यांचा रत्नाई निवासस्थानी शुक्रवारी (दि.23) सन्मान करण्यात आला.
           प्रत्येक वर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बावडा येथे आल्यानंतर परंपरेनुसार हर्षवर्धन पाटील यांचे निवासस्थानी देहू संस्थांचे पदाधिकारी व सोहळा प्रमुखांचा स्नेहभोजन देऊन सन्मान करण्यात येतो. यावेळी देहू संस्थांचे माजी अध्यक्ष ह. भ. प. बापूसाहेब मोरे महाराज देहूकर, माणिक मोरे महाराज, विशाल मोरे महाराज, बाळासाहेब मोरे महाराज, दिलीप इनामदार आदींचाही हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी संस्थांनचे पदाधिकारी व सोहळा प्रमुख यांचेशी पालखी सोहळ्यामध्ये प्रवासादरम्यान येणाऱ्या अडीअडचणींवर चर्चा केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, विजयकुमार बाजीराव पाटील, भाग्यश्री पाटील, निहार ठाकरे, अंकिता पाटील ठाकरे, उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, सुरेश जगदाळे, राजवर्धन पाटील, किरण पाटील, विकास पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *