दि. २६ जून

इंदापूर (प्रतिनिधी): युगप्रवर्तक श्री शाहू बहुउद्दशीय सेवा संस्थेच्या वतीने साठेनगर येथे शाहू महाराज जन्मोस्तोव साजरा करण्यात आला.

यावेळी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन भरत शहा म्हणाले की, छ्त्रपती शाहू महाराजांनी लोक कल्याणकारी राज्य उभा केले.आणि खऱ्या अर्थाने गोर गरीब जनतेला न्याय दिला. करण्यात आला.यानंतर 

नगरसेविका राजश्री मखरे म्हणाल्या की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मौलिक साथ देण्याचे काम काम छ्त्रपती शाहू महाराज यांनी केले. म्हणून बाबासाहेब म्हणतात की माझी जयंती दिवाळी सणा सारखी साजरी करा.

यानंतर मा. नगराध्यक्ष विठ्ठला ननावरे म्हणाले की, मागासवर्गीयांना न्याय हक्क मिळवून देणारे राजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय.

गटनेते कैलास कदम म्हणाले की, शाहू महाराज यांच्या कार्याची दखल भारतीय संविधानाला घ्यावी लागली आणि म्हणून महाराजांचे नाव देशात स्वाभिमानाने घेतले जाते.

दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी युगप्रवर्तक श्री शाहू सेवा संस्थेचे कौतुक करण्यात आले कारण गेली अखंड ८ वर्ष इंदापूर तालुक्यातून महाराजांची जयंती मिरवणुकीसह विविध उपक्रमांनी साजरी केली जाते.

डॉ.आंबेडकर नगर येथील अंगणवाडी येथे बाल चीमुंना खाऊ वाटप करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा शेख, नगरसेवक दादासाहेब सोनवणे,प्रा. कृष्णा ताटे , आर.पी.आय जिल्हा सचिव संदीपान कडवळे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सुभाष खरे, शाहू संस्थेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे,मा.नगरसेवक शेखर पाटील, हमीद अतार, महादेव चव्हाण सर, बाळासाहेब अडसूळ ,चंद्रकांत सोनवणे, अमोल खराडे, सुधीर पासगे, खंडेराव मखरे,सत्यवान शिंदे, लांडगे साहेब, वांचीतचे राहुल मखरे, व वस्ताद आकाश कांबळे , आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *