दि. २७ ऑगस्ट

 इंदापूर :   इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय कनिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व शासनाच्या निवडणूक विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या शाहीर अमर शेख सभागृहात शुक्रवार दि. 25 ऑगस्ट रोजी नवीन मतदार नाव नोंदणी आणि मतदार जन जागृती संबंधी विशेष अभियान राबविण्यात आले.

   राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ विभाग राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने हा कार्यक्रम झाला.

   निवडणूक नायब तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी निर्मला श्रीरंग मखरे यानी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.मतदार नोंदणीचे महत्त्व, नोंदणीची पद्धत ,नोंदणीचे विविध फॉर्म याविषयी निर्मला मखरे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

   क्रीडासंचालक प्रा.भरत भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले. 

      कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी मतदान नोंदणी विषयी आवाहन केले.

   यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सुभाष ओहोळ,रमेश शिंदे, किशोर होमकर उपस्थित होते.

   कनिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी सुवर्णा जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 आभार प्रा. धनंजय माने यांनी मानले.

   राट्रीय सेवा योजनेचे सहकारी शिक्षक प्रा.संतोष पानसरे प्रा. अमोल मगर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *