प्रकाश आरडे स्वराज्य न्युज

इंदापूर : (दि. २१ सप्टेंबर ) रिपब्लिकन नेते संजय भैया सोनवणे यांनी त्रस्त वाहन चालक-मालक यांना होणाऱ्या टोल प्रशासनाच्या पिळवणुकीतून सुटका व्हावी या उद्देशाने आंदोलनाची हाक कालच दिली होती, या हाकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला काल (दि.२०) हिंगणगाव येथे गोकुळ हॉटेलमध्ये आंदोलनाची दिशा ठरविण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुक्यातील व तालुक्या बाहेरील प्रचंड वाहन मालक व प्रवासी यांची उपस्थिती होती. उपस्थितांनी टोल प्रशासन कशा पद्धतीने आडवणूक करते याचा पाढाच वाचला, हे ऐकून संतापलेल्या अनेकांनी हे आक्रमक आंदोलन होणारच असा पवित्रा घेतला.
उजनी मत्स्यमार व्यावसायिकांची सामाजिक विकास संस्था चे संस्थापक अध्यक्ष, रिपब्लिकन नेते मा.संजय भैय्या सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.20/9/2022 हॉटेल गोकुळ हिंगणगाव येथे सायंकाळी 7 वाजता पुणे सोलापूर हायवेवर सरडेवाडी टोल नाका प्रशासन स्थानिक युवकांच्या व्यवसायावर अन्याय करत आहे.स्थानिक वाहनांची आर्थिक पिळवणूक करत आहे, टोल मध्ये स्थानिक युवकांना रोजगार देण्या ऐवजी बाहेर च्या कामगारांना याठिकाणी कामावर घेतले जाते,20 कि.मी.मधील सर्व वाहनांना मोफत पास मिळाले पाहिजेत,हायवेवरील सर्व कॅमेरे टोल प्रशासनाने तात्काळ सुरू करावेत , हायवेवर मोठं मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघात होत आहेत ते थांबले पाहिजे, टोल हद्दीमध्ये सर्विस रोडवर अतिक्रमण असताना त्यांना अभय दिले जाते आणि स्थानिक युवकांनी चहाच्या टपर्या सुरू केल्या आहेत त्यांना मात्र हुसकावून लावले जात आहे,असे अनेक गंभिर विषय घेऊन लवकरच या टोलच्या विरोधात न भूतो न भविष्यती असे आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. टोल प्रशासनाने मागण्या मान्य लवकर न केल्यास आंदोलन वेगळ्या वळणावर जाईल याला जबाबदार टोल प्रशासन जबाबदार असेल असेही संजय भैय्या सोनवणे यांनी यावेळी जाहीर केलकेल यावेळी कुरूमूदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.नारायणजी गायकवाड, तरटगांव ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच मा.पोपट माने,ग्रा.प.सदस्य मा.राजू सोनवणे,ग्रा.स.राजू लावंड, हिंगणगाव ग्रा.सदस्य मा.गणेश शिंगाडे ,रांजणी भिमानगरचे मा उपसरपंच तानाजी गायकवाड ,वाहन संघटनेचे अध्यक्ष मा.विनोद मखरे,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीनराव आरडे , युवा नेते विशाल जगताप,सोनू ढावरे, संकेत गायकवाड,आढेगाव चे शाहु वाघ,गागरगांव चे राहुल लोंढे प्रत्येक गावातील प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली .
दि.21/9/2022 रोजी रिपब्लिकन नेते मा.संजय भैय्या सोनवणे हे इंदापूर चे तहसीलदार मा.श्रीकांत पाटील साहेब तसेच इंदापूर चे पोलिस निरीक्षक मा.तय्युब मुजावर साहेब यांची भेट घेऊन चर्चा करून आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *