दि. २ ऑक्टोबर

इदापूर : काल (दि१) रोजी इंदापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले गढिचा समोरील बाजूचा ढाचा कोसळल्यामुळे गढीची दुरावस्था झाली आहे. या◊ पार्श्वभूमीवर इंदापूर नगरपालिका गटनेते कैलास कदम यांनी नगरपालिका प्रशासन, तहसील प्रशासन व जिल्हा प्रशासन यांना विनंती केली की कोसळलेल्या गढीचे बांधकाम ताबडतोब पूर्ण व्हावे.
वीरश्री मालोजीराजे भोसले गढि मोडकळीस आली तेव्हापासून शिवप्रेमी बरोबरच विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते इंदापुरातील सुजान नागरिक यांनी गढीचे काम ताबडतोब व्हावे यासाठी आंदोलने केली परंतु अद्याप पर्यंत याची दखल ना नगरपालिका प्रशासनाने घेतली, ना तहसील प्रशासनाने घेतली, ना पर्यटन विभागाने घेतली. त्यामुळेच या हलगर्जीपणाचा कळस होऊन अखेर काल दर्शनी भागाचा ढाचा कोसळला
यावेळी बोलताना इंदापूर नगरपालिकेचे गटनेते कैलास कदम म्हणाले की वास्तविक पाहता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याबरोबर चर्चा करून त्याचबरोबर विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी देखील अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता या दोघांनीही प्रयत्न केले परंतु फक्त आश्वासनाशिवाय काहीच पदरात पडले नाही। आता आश्वासन नको प्रत्यक्ष कृती हवी आहे. पुढे बोलताना कैलास कदम म्हणाले की गढि संदर्भात विविध पक्ष, सामाजिक संघटना यांनी पूर्वी आंदोलने केली आहेत.आता डिसेंबर महिन्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक चांदशाहवली बाबा यांचा उरूस असतो तरी नगरपालिका प्रशासन, तहसील प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी मिळून ताबडतोब या उरुसापूर्वीच गढिचे बांधकाम होणे अपेक्षित आहे तशी विनंती त्यांनी प्रशासनास केली.
यावेळी इंदापूर नागरी संघर्ष समितीचे प्राध्यापक कृष्णा ताटे, प्राध्यापक महादेव चव्हाण, हमीदभाई आतार , शिवसेना शहराध्यक्ष मेजर महादेव सोमवंशी, अनिल चव्हाण, प्रदीप पवार व अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
