दि. २५ ऑक्टोब

इंदापूर : माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभर कार्यरत असणारी “देवाभाऊ आर्मी” हे संघटन संपूर्ण राज्यभर महापुरुषांचे जयंती उत्सव, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव व अनेक सामाजिक, धार्मिक उत्सवांमध्ये सहभागी होऊन स्वच्छता मोहीम राबवीत आहे. याचाच एक भाग म्हणून शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त इंदापूर शहरात व अंबिका नगर येथे अंबिका माता मंदिराच्या परिसरात अतिशय उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी बोलताना भाजपा ओबीसी मोर्चा चे माजी तालुका अध्यक्ष पांडुरंग तात्या शिंदे म्हणाले की “देवाभाऊ आर्मी” तर्फे आम्ही रविवारी (दि २२) हि मंदिर स्वच्छता अभियान मोहीम राबवित असताना संपूर्ण शहरात व अंबिका नगर मध्ये अंबिका माता मंदिर परिसरात लोकसहभागातून ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये युवकांबरोबरच शहरातील नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार. भविष्यात देखील शहरात एखादा उत्सव, महापुरुषांची जयंती उत्सव पार पडल्यानंतर आम्ही या “देवाभाऊ आर्मी” तर्फे स्वच्छता मोहीम राबविणार आहोत.
पांडुरंग तात्या शिंदे हे माजी नगराध्यक्ष इंदापूर नगरपालिका, माजी विरोधी पक्षनेते इंदापूर नगरपालिका, संस्थापक अध्यक्ष क्रांतीज्योती विचार मंच महाराष्ट्र राज्य व माजी तालुकाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा अशी विविध पदे भूषविली असल्याने या पदाचा त्यांनी सामाजिक कार्यासाठी भरपूर उपयोग केल्याने त्यांना संघटन कौशल्य व सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव आहे.
देवाभाउ आर्मी तर्फे हा उपक्रम एकाच दिवशी संपूर्ण राज्यभर राबविण्यात आला. याला नागरिकांनी उदंड असा प्रतिसाद दिला व सामान्य जनतेकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
यावेळी या उपक्रमांमध्ये पांडुरंग तात्या शिंदे यांच्याबरोबरच संतोष जाधव, प्रेमकुमार जगताप, अवधूत बाचल, मयूर शिंदे, विशाल करडे, अमोल राऊत, रोहन मगर, देवा दुताल व अनेक युवक सहभागी होते.
